Mon. Jan 25th, 2021

भास्कर जाधवांची घरवापसी; राष्ट्रवादीला राम राम

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना राजीनामा दिला आहे. औरंगाबादला जाऊन भास्कर जाधव यांनी राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच भास्कर जाधव लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भास्कर जाधवांची घरवापसी –

राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना औरंगाबादला जाऊन राजीनामा दिला आहे.

मिलिंद नार्वेकर, अनिल परब यांच्या उपस्थिती राजीनामा दिला आहे.

त्यामुळे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते आहे.

हरिभाऊ बागडे यांनी भास्कर जाधव यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *