Wed. Apr 14th, 2021

भोंदूबाबाकडून एकाच घरातील पाच महिलांचे लैंगिक शोषण

विकृतांकडून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठलेला असतांना महाराष्ट्राची मान शरमेने झुकेल अशी स्त्री अत्याचाराची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. पुत्रप्राप्ती आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने एकाच घरातील पाच महिलांच लैगिक शोषण केल्याची घटना घटली आहे.

या नराधमाच नाव आहे सोमनाथ चव्हाण असून या महाविकृतांने पिंपरी-चिंचवड मधील एकाच कुटुंबातल्या पाच महिलांच लैगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शोषण करण्यात आलेल्या महिलांमध्ये चार अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. शोषण करण्याआधी त्याने पीडित महिलांना पुत्रप्राप्ती, गुप्तधन काढुन देण्याची आमिष दाखवली.

शोषणानंतर आपल्या कृत्याची पीडितांनी वाच्यता करू नये म्हणून त्यांना अघोरी विद्येन जीवे मारण्याची धमकीही याने दिली. मात्र याचा पडदाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांना हा प्रकार कळताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपी सोमनाथच्या तात्काळ मुसक्या आवळल्या आहेत.

आरोपी रायगड जिल्ह्यातील रोहा खैरवाडी गावचा रहिवासी असल्याची बाब तपासात समोर आली आहे. त्यानुसार तिथेही या भोंदू सोमनाथाने असे गुन्हे केले का याचाही पोलीस शोध घेत आहेत.

तर अशी भोंदूगिरी करून या नराधमाने मानवी तस्करी केली असण्याची शंका व्यक्त करत त्यानुसारही या प्रकरणाचा तपास केला जावा अशी अ.नि.स.कडून मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *