Tue. Oct 26th, 2021

‘भूत पोलिस’पोस्टर रिलीज, ‘ओटीटी’वर होणार प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या ‘भूत पोलिस’या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. बराच काळानंतर सैफ अली खान हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाप्रेमींसाठी ही चांगली आनंदाची बातमी आहे. खरंतर सैफची पत्नी करिना कपूरने या चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करुन चाहत्यांचा उत्साह द्विगुणित केला आहे. तसेच बऱ्याच काळापासून प्रेक्षक हे या चित्रपटासाठी प्रतीक्षेत होते. मात्र आता लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

‘भूत पोलिस’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निर्मात्यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.हे पोस्टर शेअर करण्याबरोबरच तिने चाहत्यांना सांगितलं आहे. की हा चित्रपट लवकरच डिजिटल प्लॅटफॉर्मवर (डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी) प्रदर्शित होईल. ‘भूत पोलिस’च्या या नव्या पोस्टरमध्ये सैफ हा वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. या पोस्टरमध्ये सैफने लेदरच्या काळ्या रंगाची जाकीट आणि गळ्यात जाड साखळी परिधान केलेला दिसत आहे.तसेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करताना सैफ अली खानची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान हिने लिहिले आहे की, “पॅरानॉर्मलची भीती बाळगू नका आणि विभूतीबरोबर ”सैफ” रहा.”पोस्टर रिलीज झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच जणांनी पोस्टरची प्रतीक्षा करीत होतो असं लिहिले आहे.‘भूत पोलिस’चे इतर कलाकार‘भूत पोलिस’ या चित्रपटात सैफअली खानबरोबर जॅकलिन फर्नांडिज, अर्जुन कपूर आणि यामी गौतम देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *