Mon. Dec 6th, 2021

छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री भूपेश बघेल

भुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. काँग्रेसकडून बघेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज म्हणजेच रविवारी छत्तीगसडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भुपेश बघेल यांची छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत बघेल यांच्याव्यतिरिक्त टीएस सिंहदेव, ताम्रध्वज साहू आणि चरण दास महंत देखील होते. मात्र बघेल यांचे नाव आघाडीवर होते. दरम्यान काँग्रेसने छत्तीसगडमध्ये 68 जागांवर विजय मिळवला आहे.

भुपेश बघेल हे छत्तीसगडमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मध्य प्रदेशातील तत्कालिन दिग्विजय सिंह सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्रीदेखील होते. तसेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी घटवण्यामध्ये बघेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *