Fri. Feb 26th, 2021

अजिंक्य”च्या भूमिकेत भारताचे पंतप्रधान मोदीजी

”सिनेमा हा समाज मनाचा आरसा असतो” या उक्ती प्रमाणे आजवर अनेक सिनेमे समाजातील काही घटनांवर आधारलेले आहेत तर काही सिनेमे सत्य घटनांच्या पार्श्वभूमीवर तयार झाले आहेत. सध्या दिल्लीत सुरु असलेला ज्वलंत आणि संवेदनशील विषय म्हणजे शेतकऱ्याचे आंदोलन आणि त्यांचे प्रश्न हा विषय अनामिक योगायोगाने मोठ्या पडद्यावर येण्याच्या तयारीत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेमका दृष्टिक्षेप टाकणारा हा सिनेमा मार्च २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता मात्र लॉकडाऊन परिणामी सिनेमा प्रेक्षकांपर्यत पोहोचू शकला नाही. मात्र २०२१ या नवीन वर्षात लवकरच प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सिनेमाची कथा एका मुत्सद्दी आणि उद्योगी तरुणाच्या म्हणजेच अजिंक्य (भूषण प्रधान) च्या भोवती फिरणारी आहे.

व्यवसायीकरणाच्या हट्टापायी पायमल्ली होत असलेल्या अनेक गोष्टीवर या सिनेमाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्याच्या समस्या आणि त्या ओघाने आलेले अतिशय महत्वाचे विषय सिनेमात मांडले आहेत. सध्या सोशल मीडियाववर ट्रेंड होणारा #AjinkyaTheMovie हा ट्विटर हॅण्डल मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांकडून पहिला जात आहे. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयावर तयार करण्यात आलेल्या व्हिडीओला सर्वच स्तरावर पसंती मिळत आहे.

शेतकरी जगवण्यासाठी आणि त्याच्या प्रगतीसाठी मोठ्या प्रमाणावर खुल्या केलेल्या दालनांबद्दल दिलेली माहिती या व्हिडीओत प्रामुख्याने पाहायला मिळते. अजिंक्य हा सिनेमा सिनेमागृहात आल्यावर प्रेक्षक नक्की पाहतील मात्र सध्या अजिंक्यची नेमकी भूमिका पंतप्रधान मोदीजींच्या निर्णयातून संपूर्ण भारताला पाहायला मिळत असल्याचे मत नीरज आनंद यांनी मांडले आहे. ते अजिंक्य सिनेमाच्या पाच निर्मात्यांपैकी एक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *