Wed. Aug 10th, 2022

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस १३ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी निधन झाले . वयाच्या ४० व्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची माहिती मुंबईतील कुपर रुग्णालयाने दिली आहे . त्याच्या निधनानंतर सर्वांनच धक्का बसला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत आहेत.

बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी सिद्धार्थला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात दाखल करताच त्याला मृत घोषित करण्यात आले.

१२ डिसेंबर १९८० साली सिद्धार्थचा जन्म मुंबईत झाला. त्याने एक मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली होती. २००४ साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर २००८ मध्ये त्याने बाबुल का आंगन छूटे या मालिकेत काम केले. पण ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती.

सिद्धार्थ छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे.सिद्धार्थने ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’ यांसारख्या मालिकांत काम केलं होतं. तर ‘झलक दिखला जा ६’, ‘फिअर फॅक्टर’, ‘खतरों के खिलाडी ७’ आणि ‘बिग बॉस १३’ मध्ये तो झळकला होता.

त्यानंतर ‘जाने पहचाने से.ये अजनबी’, ‘लव्ह यू जिंदगी’ यांसारख्या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या. मात्र ‘बालिका वधू’ या मालिकेतील भूमिकेमुळे तो घराघरात पोहोचला.सिद्धार्थने बऱ्याच रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.

मॉडेलिंगनंतर सिद्धार्थने टीव्हीवर आपलं नाणं खणखणीत वाजवलं. यानंतर अभिनेत्याने बॉलिवूडकडे आपलं लक्ष केंद्रीत केलं. २०१४ मध्ये हंम्टी शर्मा की दुल्हनिया सिनेमात तो दिसला होता. याचवर्षी त्याची ब्रोकन बट ब्युटिफूल ही वेब सीरिजही प्रदर्शित झाली होती. या सीरिजची खूप चर्चाही झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.