Jaimaharashtra news

ठाण्यात नाल्यात पडून बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

ठाणे :  ठाण्यात सध्या नाल्यांचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून त्यासाठी जागोजागी प्रचंड मोठे खड्डे खणून ठेवण्यात आले आहेत. त्यातच आता पावसाला सुरुवात झाली असून, खोदलेल्या या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात घडत आहेत. ठाण्यातील कोरम मॉल येथील एका नाल्यात पडून बाईकस्वार युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन युवकाचे शव बाहेर काढले.

Exit mobile version