Mon. Jan 17th, 2022

बबड्याची शुभ्रासोबत बाईकराईड, नेटिझन्स म्हणतात ‘लग्न करा’!

‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. यातील बबड्या हे पात्र लोकांच्या रोषाचं कारण बनत आहे. कारण त्याचा दुष्टपणा. आई, सावत्र वडील, आजोबा आणि पत्नी शुभ्रा हिच्याशी तो ज्या पद्धतीने वागतोय, त्यामुळे तो प्रेक्षकांच्या दृष्टीने खलनायकच बनला आहे. मात्र पडद्यावर पत्नीला त्रास देणाऱ्या या खलनायकाशी पडद्याबाहेर मात्र शुभ्राची चांगलीच गट्टी जमली आहे. ही पात्रं साकारणारे तेजश्री प्रधान आणि अभिनेता आशुतोष पत्की यांच्यात चांगली मैत्री आहे. दोघांनी नुकतीच बाईकराईड एंजॉय केल्याचं आशुतोषच्या Instagram वरील फोटोवरून समोर आलं.

आशुतोषने Instagram वर एक फोटो पोस्ट केला आहे. यात आपल्याप्रमाणेच तेजश्रीलाही बाईक चालवण्याची आवड असल्याबद्दल त्याने कॅप्शन टाकलं आहे. ‘आपल्यासारखा मित्र भेटणं हे मौल्यवान असतं.’ असं या फोटोखाली लिहिलं आहे.

यावर कमेंट करत “आपण दोघं क्रेझी आहोत” असं तेजश्री प्रधानने लिहिलंय.

या फोटोवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेक चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे. काही जण तर दोघांची जोडी पाहून त्यांना लग्न करायचाही सल्ला देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *