Tue. Apr 20th, 2021

‘या’ अभिमानास्पद कारणासाठी बिल गेट्स यांनी दिला Microsoft च्या संचालक मंडळाचा राजीनामा

मायक्रोसॉफ्टचे जनक आणि सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचाही आता राजीनामा दिला आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा बहुमान पटकवणाऱ्या बिल गेट्स यांनी राजीनाम्याच्या निर्णयासाठी दिलेलं कारण अभिनंदनीय आहे. जनसेवेसाठी अधिक वेळ देता यावा, यासाठी आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलंय. राजीनाम्यानंतरही कंपनीमध्ये ते तांत्रिक सल्लागाराची भूमिका पार पाडत राहणार आहेत.

1975 साली Microsoft कंपनीची स्थापना केल्यानंतर Microsoft Windows च्या माध्यमातून मोठं बिझनेस साम्राज्य उभं केलं. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचण्याचा मान त्यांनी मिळवला. मात्र कालांतराने त्यांनी दैनंदिन कामातून बाहेर पडत समाजकार्याला वाहून घेतलं. 2000 साली त्यांनी CEO पदी स्टीव्ह बेललमोर यांच्याकडे पदभार सोपवला. 2014 पर्यंत ते कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे टटेअरमन होते. 2014 मध्येच त्यांनी भारतीय वंशाच्या सत्या नडेला यांनी Microsoft चे CEO नेमलं.

आता संचालक मंडळातूनही निवृत्त होत त्यांनी स्वतःला आणखी एका जबाबदारीतून मुक्त करत लोककल्याणाला अधिकाधिक वेळ देण्याचं ठरवलं आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *