Tue. Mar 2nd, 2021

हरियाणात ‘बर्ड-फ्लू’मुळे सुमारे दोन लाख कोंबड्यांची होणार कत्तल

गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध प्रकारच्या आजारांचा शिरकाव झाल्याचं बघायला मिळत आहे. सध्या केरळमध्ये ‘बर्ड-फ्लू’मुळे भितीच वातावरण आहे. त्यामुळे अनेक कोंबड्याचं कत्तल हा केरळमध्ये झाला आहे. आता यापाठोपाठ हरियाणाच्या पंचकुलामध्ये काही दिवसांपूर्वी अचानक कोंबड्या मरुन पडलेल्या आढळल्या होत्या. यानंतर या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळला पाठवण्यात आले होते. या तीन नमुन्यांपैकी दोन नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं हरियाणात सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय देशातील विविध राज्यांमध्ये बर्ड-फ्लूचा प्रसार झालेला पहायला मिळत आहे.

अनेक राज्यात आतापर्यंत हजारो पक्षांचा यामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर आता हरियाणामध्येही हा बर्ड फ्लू पोहोचला असल्याचे समोर आले आहे. आता संदर्भात प्रशासनाने खबरदारी म्हणून अलर्ट घोषित केला आहे. पंचकुलाच्या ज्या परिसरात मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या, त्याच्या एक किलोमीटर परिघात पाच पोल्ट्री फार्म आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या पाचही पोल्ट्री फार्मवरील एक लाख ६६ हजार २२८ कोंबड्यांना ठार करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी २५ डिसेंबरच्या आसपास राजस्थानमध्ये हा फ्लू पहिल्यांदा दिसून आला. त्यानंतर अनेक राज्यात हा बर्ड-फ्लू पसरला आहे. एव्हियन इन्फ्लूएन्झा या विषाणूच्या एच५एन८ या स्ट्रेनमुळे हा फ्लू होत आहे. सध्या माणसांमध्ये याचा कोणताही परिणाम दिसून आला नसला, तरी खबरदारी म्हणून या सर्व ठिकाणी अंडी आणि मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *