विधानसभेत राडा, शिवसेना-भाजप आमदार भिडले

नागपूर : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गोंधळाने झाली. विधानसभेत दोन आमदार एकमेकांसोबत भिडले आहेत. बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि औसा मतदारसंघातील भाजप आमदार अभिमन्यू पवार हे एकमेकांवर धावून गेले.
नक्की काय घडलं ?
विधानसभेत शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्दयावरुन गोंधळ उडाला. कामकाज सुरु असताना भाजप आमदारांकडून सभागृहात सामनाच्या अग्रलेखाचे पोस्टर्स झळकावण्यात आले.
शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत विधानसभेचं कामकाज स्थगित केलं जावं, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. यानंतर हे भाजप-सेनेचे आमदार आपसात भिडले. या दोन्ही आमदारांना सोडवण्यासाठी वरिष्ठ सदस्यांनी मध्यस्थी केली.