अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने दिला दिलासा
अर्णब गोस्वामी यांचा सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला..

वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे.
अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. यासोबतच सुप्रीम कोर्टाने अर्णब गोस्वामी यांची तात्काळ सुटका करण्याचा आदेश दिला आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत न्यायालयाचे आभार मानले आहे. आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “धन्यवाद आदरणीय सुप्रीम कोर्ट…कायद्याचं राज्य कायम आहे.
न्यायाची थट्टा करण्याची परवानही दिली जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक अहंकार किंवा अजेंडासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य ओलीस ठेवू शकत नाही”. आशिष शेलार यांनी यावेळी #Arnabisback हा हॅशटॅगही दिला आहे.
Thank https://t.co/FyQKknV12B
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 11, 2020
Rule of law Upheld !
Travesty of justice cannot be allowed !
Personal liberty cannot be hostage to an individual/s personal ego or vested agenda !#Arnabisback
मुंबई उच्च न्यायालयाने जामीन याचिका फेटाळल्यानंतर काही तासातच अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या न्यायपीठापुढे ही सुनावणी पार पडली.