चंद्रकांत पाटील घेणार राज ठाकरेंची भेट

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कृष्णकुंजवर दाखल आले आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
भाजप-मनसे युतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष असून राज्यातील जनतेच्या अधिकारांचे रक्षण आणि स्वाभिमान जपताना परप्रांतीयांवर अन्यायाची मनसेची भूमिका मात्र भाजपला मान्य नाही. मनसेने परप्रांतीयांना विरोधाची भूमिका बाजूला ठेवली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले.
या भेटीसंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मनसे आणि भाजपाची युती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र त्याचवेळी पाटील यांनी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट का घेतली यासंदर्भातही खुलासा केला.
‘मनसेचे इतर राज्यांबद्दलचे विचार आम्हाला मान्य नाहीत. मात्र मतभेद असले तरी एकमेकांच्या भेटीगाठी घेणं महत्वाचं असतं म्हणून मी उद्या राज ठाकरेंची भेट घेणार आहे’, असं चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी म्हटलं. तसेच ही सदिच्छा भेट असल्याचेदेखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.