Thu. Jan 28th, 2021

वर्ध्यात वंचित आघाडीचा उमेदवार जाहीर, काँग्रेस भाजपाचं ‘वेट अँड वॉच’!

वर्ध्यात काँग्रेस, भाजप तसंच बसपा मधील उमेदवारीचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाही. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आघाडीसाठी काँग्रेसला अल्टीमेटम दिलंय. तर भाजपात रामदास तडस की सागर मेघे असा अंतर्गत वाद सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उंबरठ्यावर असताना बसपानेही अजून आपला उमेदवार जाहीर केला नाहीय.

भाजपचा भावी उमेदवार कोण ?

भाजपात उमेदवारी साठी मेघे समर्थक आणि तडस समर्थक अशी गटबाजी वाढली आहे.

खासदार रामदास तडस यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येतंय.

तर मेघे समर्थकही सागर मेघेंची उमेदवारी निश्चित असल्याचं सांगतात.

अशात दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही

काँग्रेसच्या प्रचार हलचाली थंडावल्या!

काँग्रेसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जागेच्या मागणीमुळे प्रचार हालचाली थंडावल्या आहेत.

नेमकी जागा कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अशातच असतानाच चारुलता टोकस आणि स्वाभिमानीचे सुबोध मोहिते यांची धडपड आता धडकीत बदलली आहे.

बसपाचा उमेदवार कोण?

दुसरीकडे बहुजन समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांनी लवकरच सशक्त उमेदवार देणार असल्याच सांगितलंय.

वंचित बहुजन आघाडीने माजी पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांना उमेदवारी जाहीर केलीय. भाजप, काँग्रेससारखे पक्ष मात्र अजूनही ‘वेट अँड वॉच’चीच भूमिका घेत आहेत. मात्र याचा प्रचारावर काय परिणाम होणार, हा ही महत्त्वाचा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *