Fri. Apr 23rd, 2021

नवी मुबंईत भाजपा नगरसेवकाचा मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला ?

भाजपा नगरसेवकाने मनसे कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील कामोठे येथे घडली. ही घटना 29 एप्रिल रोजी 12 वाजता घडल्याची माहिती समोर आली आहे. विजय चिपळेकर असे या पनवेल महानगर पालिकेतील भाजपा नगरसेवकाचे नाव आहे. अंतर्गत वादातून हा जीवघेणा हल्ला केल्याचे समजते आहे.

नेमकं काय घडलं ?

पनवेल महानगर पालिकेतील भाजपा नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप लावला आहे.

हा हल्ला 29 एप्रिलच्या रात्री 12 वाजता घडला.

विजय चिपळेकर यांच्यासोबत त्यांचे 8-10 कार्यकर्त्यांसोबत मिळून हा हल्ला केल्याचा आरोप लावला.

सोसायटीतील अंतर्गत वादातून विजय चिपळेकर यांनी मनसे अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर हल्ला केला असा आरोप करण्यात आला.

या हल्ल्यात प्रशांत जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

कामोठेतील सेक्टर 7 येथील शुभंकर सोसायटीत ही घटना घडली आहे.

विजय चिपळेकरसह 6 ते 7 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *