भाजप शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांची भेट घेतली. यावेळी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नये या मागणीसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने यूपीएस मदान यांची भेट घेतली. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रविण दरेकर उपस्थित होते.
राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची इम्पेरिकल डेटाची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला. तसेच आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्यासाठी भाजप शिष्टमंडळाने निवडणुक आयुक्त यूपीएस मदान यांची भेट घेतली.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे म्हणजे ओबीसींवर अन्याय, अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाविषयी न्यायलयात भूमिका मांडली नसल्यामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यामुळे भाजप नेते पंकजा मुंडे, प्रविण दरेकर आणि आशिष शेलार यांनी निवडणुक आयोगाची भेट घेतली.