Jaimaharashtra news

भाजपने आमच्यावर अन्याय केला – महादेव जानकर

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर ठेपली असून राजकीय पक्षात जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. त्याचसंदर्भात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पत्रकार परिषद घेतली. भाजपाने आम्हाला फसवल्याची भावना महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे. महायुतीत रासपचा समावेश असून रासप भाजपाच्या चिन्हावर लढणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. गंगाखेडची जागा आम्हाला रासपच्या चिन्हावर लढायची असल्याचेही महादेव जानकरांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले महादेव जानकर ?

राष्ट्रीय समाज पक्षाचा (रासप) स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी काहीही करू असे महादेव जानकर यांनी म्हटलं.
भाजपाने रासपाला दोन जागा सोडल्या. त्यातच भाजपाने आपल्या चिन्हाचा AB फॉर्म दिला.
भाजपने आमच्यावर अन्याय केला असल्याचेही जानकर म्हणाले.
मात्र तरीही रासप महायुतीतुन बाहेर जाणार नाही.
रासपाला स्वत:च्या चिन्हावर फक्त एकाच जागेवर लाढण्यास मिळत आहे.
त्यामुळे माझे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले होते, मित्र पक्षाला जागा दाखवली असल्याचे ते खरं असल्याचे महादेव जानकर म्हणाले.
Exit mobile version