#MPPoliticalCrisis : भाजपकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मध्य प्रदेशमधील राजकारणात दिवसागणिक घडामोडी घडत आहेत. विरोधकांच्या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज २६ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
कामकाज तहकूब केल्याने बहुमत चाचणी देखील आज घेण्यात आली नाही.
बहुमत चाचणी घेण्याचे आदेश राज्यपाल टंडन यांनी दिले होते. परंतु सभागृहाच कामकाज पुढील १० दिवसांपासन स्थगित केलं आहे.
त्यामुळे काँग्रेसला काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचं म्हटलं जात आहे. भाजपने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे.
कमलनाथ सरकारला २६ मार्चपर्यंत दिलासा
बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने सुप्रीम कोर्टात य़ाचिका केली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून विश्वासदर्शक ठराव घेण्याची मागणी भाजपच्यावतीने करण्यात आली आहे.