अभिनेते खासदार शत्रुघ्न सिन्हा भाजपमधून काँग्रेसमध्ये?

भाजपचे बंडखोर नेते खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर कॉग्रेसमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. २८ मार्चला ते कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्त्यांना पटना साहिब या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार आहे. ते सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेगवेगळ्या मुद्यांवरुन लक्ष करत होते. यामुळे सिन्हा यांच्यावर पक्षनेतृत्वात रोष असल्याचे सांगितले जात होते.
त्यामुळे यावेळी भाजपने त्यांना उमेदवारी नाकारली आहे. सिन्हा यांच्या जागेवर केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सिन्हा आणि प्रसाद हे दोन्ही कायस्थ समाजाचे आहे.या मतदारसंघात या समाजाची लक्षणीय मते आहेत. त्यामुळे या जागेवरुन पुन्हा एकदा चुरशीची लढत पहायला मिळणार आहे.
खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश?
२०१४ मध्ये शत्रुघ्न सिन्हा हे भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून खासदारही झाले.
भाजपाचे खासदार असले तरीही नरेंद्र मोंदीवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नव्हते.
नोटाबंदीचा जीएसटी,सीबीआय,आरबीआयशी संबंधित बाबी यावरून ते मोदींना लक्ष करत होते.
असोत शत्रुघ्न सिन्हा यांनी कायमच पक्षावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
शत्रुघ्न सिन्हा यांनी वेगवेगळ्या मुद्यांवरुन ट्विटरच्या माध्यमाधून मोदींना लक्ष केलं आहे.
सिन्हा यांच्या सतत माेंदीवर टीका करण्यामुळे त्यांना भाजपाचे बंडखोर नेते असं म्हटलं जात होत.
निवडणुकीत भाजपकडून तिकीट कापलं गेलं केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली.
यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपाला जय श्रीराम करत काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी केली आहे.
खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचं ट्विट
मोहब्बत करनेवाले कम ना होंगे, तेरी महफिलमें लेकिन हम ना होंगे असा हा शेर होता.
यातून भाजपाला सोडचिठ्ठी देणार असे संकेत दिले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून ते सातत्याने काँग्रेस आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची स्तुती करत आहेत.
यावरूनच राजकीय वर्तुळात ते भाजपातून काँग्रेसमध्ये जातील अशी चर्चा आहे.