Thu. Nov 26th, 2020

दाऊदची दावत भाजप मंत्र्याला भोवणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नाशिकमध्ये पार पडलेल्या विवाहसोहळ्यात उपस्थित राहणं गिरिश महाजनांच्या अंगलट आले.

 

हा लग्न सोहळा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाचा असल्याचं बोललं जात आहे.

 

नाशिकमध्ये जग्गी कोकणी आणि खतीब कुटुंबियामध्ये हा विवाह सोहळा पार पडला. कोकणी यांची मुलगी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या मुलाला दिली.

 

पण, याच लग्न सोहळ्यात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन मेजवानी झोडताना दिसत होते. भाजपचे आमदार , महापौर यांच्यासह नाशिकमधले सर्वपक्षीय नेते,

नगरसेवकही मेजवानी झोडताना दिसत होते.

 

एवढंच नाही तर या लग्नाची दावत खाणाऱ्या एसपी, 2 पीआय, 2 पीएसआय आणि काही पोलिसांचाही समावेश होता. या लग्नात पैसेही उधळण्यात आले. लग्नाला

उपस्थित राहणाऱ्या पोलिसांची नाशिक पोलीस आयुक्तांनी चौकशी केली.

 

तसेच दोषींवर कारवाई करणार असल्याचं पोलीस महासंचालक सतिश माथूर यांनी सांगितले.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *