Fri. Apr 23rd, 2021

BJP आमदार मंदा म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल

नवी मुंबईतील भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत मतदारांना चक्क दोन वेळा मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं होत. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात होती. आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 तारखेला नरेंद्र पाटील आणि 29 तारखेला राजन विचारेंना मतदान करा असे आवाहन त्यांनी केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल शिंदे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

दोन वेळा मतदान करण्याचे आवाहन

कोपरखैरणे येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मंदा म्हात्रे यांनी एक अजब वक्तव्य केलं होत.

23 तारखेला नरेंद्र पाटील आणि 29 तारखेला राजन विचारेंना मतदान करा असे आवाहन त्यांनी केलं होतं.

येथे माथाडी वर्ग मोठ्या संख्येने असल्याने मंदा म्हात्रे यांनी असं आवाहन केलं होतं

शरद पवार दोनवेळा मतदान करण्याचे आवाहन करू शकतात, तर आपण का नाही करायचं, असं ही त्या म्हणाल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल शिंदे यांनी मंदा म्हात्रे यांच्या यावक्तव्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

कोपर खैरणे पोलीस ठाण्यातमंदा म्हात्रेंवर आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *