आरे आंदोलनाप्रमाणे नाणार प्रकरणातील गुन्हे मागे घ्यावे – नितेश राणे

मुंबई : नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे प्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे. पण याच पार्श्वभूमीवर नाणार आंदोलनकर्त्यांवरील केसेस पण मागे घ्याव्यात, असे ट्विट भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
ट्विटमध्ये काय म्हणाले राणे ?
आरे आंदोलनातील पर्यावरणप्रेमींवरील केसेस मागे घेतल्यात. त्याच प्रमाणे नाणार आंदोलनकर्त्यांवरील केसेस पण मागे घेण्यात याव्यात. नाणारमधील लोकं देखील पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठीच लढत होते, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
त्यामुळे आता नितेश राणे यांच्या ट्विटला काय प्रतिक्रिया दिेली जाते, याकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे.
आरेतील बिरसा मुंडा चौक येथे ४ ऑक्टोबरला रात्री वृक्षतोडीस सुरुवात झाली होती. वृक्षतोडीची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमींनी या सर्व प्रकाराला विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी २९ जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले होते.