Jaimaharashtra news

भाजपच्या ‘त्या’ रंगेल पदाधिकाऱ्याला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक

जय महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली

 

गडचिरोलीमधील भाजपचा जिल्हा सरचिटणीस रवींद्र बावनथडेला अखेर अटक करण्यात आली. एका खासगी बसमध्ये प्रवास करताना तरुणीशी अश्लील चाळे करतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

 

 

तरुणीच्या तक्रारीनंतर बलात्काराच्या आरोपाखाली त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. रवींद्र बानवथडेनं लग्नाचं आणि नोकरीचं आमिष दाखवत पीडित मुलीवर अत्याचार केले होते. 27 जून रोजी बावनथडे नागपूरहून एका खासगी बसमधून प्रवास करत होता त्यावेळी त्यानं तरुणीशी अश्लील चाळे केले. ही दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली.

 

 

दरम्यान, या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली. तर या नरामधावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामान्य लोक करत आहेत.

Exit mobile version