Wed. Jan 19th, 2022

‘गिरीश कुबेरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही’

पत्रकार गिरिश कुबेर यांच्या ‘रीनैसंस द स्टेट’ या पुस्तकामधील छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह लिखाणावरून वाद निर्माण झाला असून सोमवारी संभाजी ब्रिगेडने या पुस्तकावर बंदी घालायची मागणी केली. तर छत्रपती संभाजी राजांच्या बदनामी प्रकरणी गिरिश कुबेर यांनी माफी मागावी अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केली. तर आता भाजप खासदार संभाजीराजे यांनीदेखील गिरीश कुबेर यांच्यावर टीका केली आहे.

गिरीश कुबेर यांच्या ‘रीनैसंस द स्टेट’ या पुस्तकामध्ये शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयरबाई राणीसाहेब यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे वाचनात आले. सर्वप्रथम पुस्तकाचे लेखक गिरीश कुबेर यांचा जाहीर निषेध’, असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचे योगदान सर्वश्रुत आहे. काहीतरी विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी किंवा खोडसाळपणा करुन प्रसिद्धी मिळवण्यासाठी अश्या प्रकारचे संदर्भहीन लिखाण बरेच लोक करत असतात.यापैकीच एक हे असावेत.’रीनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर महाराष्ट्रात आणि देशभर कायमची बंदी घालण्यात यावी तसेच बाजारत विक्रीसाठी उपलब्ध झालेली ही सर्व पुस्तके शासनाच्या ताब्यात घ्यावीत’, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कुबेरांचे हे लेखन म्हणजे मूर्खपणा आहे ,आम्ही त्यांचा धिक्कार करतो ,गिरीश कुबेरांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असंदेखील खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी हीच आमची भूमिका असल्याचं म्हटलं आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे, असंदेखील नाना पटोले म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *