Mon. Feb 24th, 2020

‘या’ बंडोबांची बंडखोरी सेना भाजपच्या पथ्यावर पडणार?

भाजप-शिवसेनेत युती झाली असली तरी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी युतीच्या उमेदवारांनी एकमेकांविरोधात तर काही ठिकाणी आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली होती.

भाजप-शिवसेनेत युती झाली असली तरी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी युतीच्या उमेदवारांनी एकमेकांविरोधात तर काही ठिकाणी आपल्याच पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केली होती. या बंडखोरांना थंड करण्यासाठी सेना भाजपच्या नेत्यांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले काही बंडखोरांना सत्ता आल्यावर महामंडळावर नियुक्त करण्याचे आश्वासनही दिलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी पक्षाला यश आल्याचे तर काही ठिकाणी प्रयत्न तोकडे पडल्याचे स्पष्ट झालं आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघातून शिवसेनेन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली  त्यासाठी विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांचा पत्ता कापण्यात आल्याने नाराज झालेल्या सावंत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. हा बंड थंड करण्यात शिवसेनेला अपयश आलं महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या शिवसंग्राम पक्षाला वर्सोव्याची जागा सोडण्यात आली.

मात्र या पक्षाने भाजपच्या कमळ चिन्हावर भारती लव्हेकर यांना निवडणूक रिंगणात उतरवले. जागावाटपात ही जागा शिवसेनेला मिळेल, अशी आशा होती.  तसे न झाल्याने शिवसेनेच्या विभागप्रमुख आणि नगरसेविका राजुल पटेल यांनी येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर अंधेरी पूर्व मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रमेश लटके यांच्याविरुद्धही बंडखोरी करण्यात आली.

भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांनीही रिंगणात कायम राहण्याचा निर्धार केल्याने लटकेची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे ही बंडखोरी सेना – भाजपच्या पथ्यवार पडणार अशी चर्चा होतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *