Sun. Apr 5th, 2020

उदयनराजेंच्या खासदारकीसाठी भाजपचे प्रयत्न, केंद्रात मंत्रीपदही?

साताऱ्याचे माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांना पुन्हा खासदारकी देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या उदयनराजेंना निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यामुळे पद मिळण्याची शक्यता धूसर झाली होती. मात्र आता त्यांची राज्यसभेवर निवड करण्याबाबतचा विचार अंतिम झाला असल्याचं सांगण्यात येतंय.

येत्या एप्रिल महिन्यात 2 तारखेला महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एकूण 19 पैकी 7 जागांवरचे खासदार निवृत्त होणार आहेत.

निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचाही समावेश आहे.

हे खासदार होणार आहेत निवृत्त-

शरद पवार यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) मजिद मेमन,

भाजपचे (BJP) अमर साबळे,

शिवसेनेचे (Shivsena) राजकुमार धूत,

काँग्रेसचे (Congress) हुसेन दलवाई,

रिपाइंचे (RPI) रामदास आठवले

अपक्ष खासदार संजय काकडे निवृत्त होणार आहेत.

त्यामुळे आता त्यांना शह देण्यासाठी छत्रपती उदयनराजे (CHH Udayanraje Bhosle) यांना राज्यसभेची खासदारकी देऊन पुढे केंद्रात मंत्रीपद देण्याचाही घाट घातल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.

त्यामुळेच त्या दिशेने पहिलं पाऊल म्हणून साताऱ्यातील (Satara) माजी खासदार उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर घेण्याची तयारी भाजप करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *