Thu. Jul 2nd, 2020

नागपुरातील खळबळजनक घटना, एकाच कुटुंबातील 5 जणांची निघृणपणे हत्या…

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

नागपुरमध्ये रविवारी रात्री एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील दिघोरी भागात राहणाऱ्या भाजप कार्यकर्ते ‘कमलाकर पोहनकर’ यांच्या कुटुंबातील 5 जणांची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. भाजपचे कार्यकर्ते कमलाकर पोहनकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची धारदार शस्त्राचा वापर करून निघृणपणे हत्या करण्यात आली आहे.

मृतांमध्ये कमलाकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील लहान मुलगा, मुलगी, आई आणि पत्नी यांचा समावेश आहे. या हत्याकांडामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हत्याकांडामागचे नेमके कारण काय आहे, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

मात्र नागपुरमध्ये वारंवार अशा प्रकारच्या खळबळजनक घटना समोर येत आहेत. आता या हत्याकांडामागचे नेमके कारण काय आहे ?, हे हत्याकांड घडवणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा कधी होणार ? याकडेचं सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *