मुलाने घेतली माघार, गणेश नाईकच ऐरोलीतून लढणार

भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर त्यामध्ये अनेक दिग्गजांना वगळण्यात आले आहे. यामध्ये गणेश नाईकांनीही वगळण्यात आले होते. मात्र आता गणेश नाईकांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
कशी मिळाली गणेश नाईकांना उमेदवारी ?
संदीप नाईक हे ऐरोली मतदार संघातून निवडणूक लढवणार होते.
मात्र गणेश नाईकांनी विधानसभा निवडणुक लढावी म्हणून त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
गणेश नाईक आता ऐरोली मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत.
गणेश नाईकांनी बेलापूर मतदारसंघातून उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता.
मात्र त्यांच्या जागी विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपाने मंदा म्हात्रे यांना तिकीट दिल्याने गणेश नाईक यांची संधी हुकली असल्याची चर्चा होत आहे.
त्यामुळे नाराज गणेश नाईक यांनी सकाळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली होती.