Tue. May 17th, 2022

बीडमध्ये भाजपची सत्ता, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला धक्का

बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायत निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. बीडमध्ये भाजपला १० जागा मिळाल्या आहेत. आष्टी, शिरोदा, पाटोदा नगरपंचायतमध्ये भाजपची सत्ता आली असून महाविकास आघडीचा पराभव झाला आहे. त्यामुळे बीडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बाजी मारली आहे.

बीडमध्ये भाजप विजयी झाल्यानंतर पकंजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, सत्ता असूनही धनंजय मुंडे यांना यश मिळवणे कठीण झाले आहे. बीडमध्ये भाजपला लोकांनी साथ दिली. बीडमधील नगरपंचायतीमध्ये भाजपचे वर्चस्व आल्यामळे विजयी उमेदवारांचे पंकजा मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. भाजप विरोधी पक्षांमध्ये नाही  आहे, महाराष्ट्राने सत्ता स्थापन केली आहे, परंतु केवळ राजकारणामुळे भाजप सत्ते नाही आहे. मात्र, भाजपचा आकडा वाढत आहे यावर आमचे लक्ष असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

1 thought on “बीडमध्ये भाजपची सत्ता, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला धक्का

  1. I’ll gear this review to 2 types of people: current Zune owners who are considering an upgrade, and people trying to decide between a Zune and an iPod. (There are other players worth considering out there, like the Sony Walkman X, but I hope this gives you enough info to make an informed decision of the Zune vs players other than the iPod line as well.)

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.