Thu. Apr 22nd, 2021

काळवीट शिकार प्रकरणी सैफ अली खानसह पाच जणांना पुन्हा नोटीस

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम यांना नव्याने नोटीस बजावण्यात आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने ही नोटीस बजावली आहे. राज्य सरकारने निर्दोष मुक्त सुटका कऱण्याविरोधात याचिका दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली. गतवर्षी 5 एप्रिल रोजी मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांकडून सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी 8 आठवड्यानंतर होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

1198 मध्ये सलमान खानवर काळवीटांची शिकार केल्याचा आरोप झाला.

सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम, दुष्यम सिंग आणि दिनेश या आरोपींचा यात समावेश आहे.

1 आणि 2 ऑक्टोंबर 1998 रोजी कांकाणी गावात हे सातहूी आरोपी शिकारीस गेले होते.

जिप्सी गाडीतून हे सगळे शिकारीस गेले होते. आणि सलमान खानने दोन काळवीटांवर हल्ला केला आहे.

यावेळी त्याठिकाणी गाववाले आल्याने दोन्ही काळवीटांना मृत अवस्थेत सोडून सलमान पळून गेला.

याप्रकरणी या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु सलमान सोडून सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.

राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने पुन्हा याप्रकरणी नोटीस पाठवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *