प्रेक्षक पुन्हा होणार झिंगाट… आता ‘सैराट’ सिनेमाची बनणार मालिका ?

‘झिंगाट’ गाण्याने सर्वांना थिरकायला लावणारी, खळखळून हसवत शेवटी विचार करायला लावणारी कथा, टाळ्या-शिट्ट्या मिळवणारे आर्ची-परश्याचे दमदार डायलॉग्स… या सर्वांना सैराट करून सोडणारे नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमावर आधारित हिंदी मालिका लवकरच छोट्या पडद्यावर येणार असल्याची चर्चा आहे.
रुपेरी पडद्यावरील ‘सैराट’च्या यशानंतर आता हा सिनेमा छोट्या पडद्यावर मालिकेच्या रुपात दिसणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैराटवर आधारित या मालिकेचे दिग्दर्शन राजेश राम सिंग करणार असून टीव्ही अभिनेता कमल नारायण राजवंशी या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
आर्ची आणि परश्याच्या भूमिकेसाठी मात्र अद्याप कलाकारांची नावं निश्चित झालेली नाहीत.
सध्या मालिकेतील या मुख्य भूमिकांसाठी कलाकारांचा शोध सुरू आहे.
ही मालिका कधी प्रदर्शित होईल किंवा चित्रीकरणाला सुरूवात कधी होईल याच्या तारखादेखील अजून निश्चित झालेल्या नाहीत.’
आतापर्यंत वेगवेगळ्या भाषांमध्ये ‘सैराट’ चे रिमेक करण्यात आले. हिंदीतदेखील ‘धडक’ सिनेमा बनवण्यात आला.
पण, दोन्ही सिनेमांचे शेवट मात्र वेगळे होते. त्यामुळे ‘सैराट’वर आधारित या मालिकेचा शेवट कसा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.