जीवघेणा ब्ल्यू गेम हटवा; केंद्र सरकारचे सर्व सोशल साईट्सला आदेश
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
मुलांना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या ‘ब्ल्यू व्हेल चॅलेंज’ गेमवर सरकारनं बंदी घातली.
या गेमच्या जाळ्यात अडकल्यामुळे मुंबई आणि कोलकात्यातील मुलानं आत्महत्या केली होती. इंदूर आणि सोलापुरातील दोन मुलांना वाचवण्यात आलं होते.
त्यामुळे या गेमचा वाढता धोका पाहता अनेक राज्यांनी या गेमवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारनं या गेमवर बंदी घालत सर्वे सोशल मीडिया
प्लॅटफॉर्मला निर्देश देत गेम त्वरित हटवण्यास सांगितले.
दरम्यान बनावट आयपी ॲड्रेस आणि प्रॉक्झी यूआरएलनं हा गेम तयार केला आहे. शिवाय हिंसाचाराला उत्तेजन देणारे गेम आमच्या धोरणाविरुद्ध असल्याचं गुगलच्या
प्रवक्तयाने सांगितले. या गेममुळे रशिया, ब्राझील आणि अर्जेंटिनासह जवळपास 19 देशांत 300हून अधिक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.