Tue. May 11th, 2021

म्हणून मुंबई पालिकेची इंटरनेट यंत्रणा 6 तास बंद होती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सायबर हल्ल्याचा फटका बसू नये यासाठी सोमवारी मुंबई पालिकेची तब्बल सहा तास इंटरनेट यंत्रणा बंद होती. सोमवारी प्रशासकीय कामकाज दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत ही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.

 

पालिकेतील जुन्या ‘विंडोज एक्सपी’ ऑपरेटींग यंत्रणेला कोणताही फटका बसू नये म्हणन इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली. सध्या ‘रॅन्समवेअर’नं धुमाकूळ घातला आहे.

 

त्याच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन’नं ‘पॅच’ हे अँटी व्हायरस तात्काळ उपयोगात आणले. आणि त्यानंतर तब्बल सहा तासानंतर पालिकेची इंटरनेट सेवा सुरळीत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *