Mon. Dec 6th, 2021

आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

देशात लोकसभा निवडणुकीचे तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाह असतानाच मुंबई पालिकेचा 2019-20 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

पालिका आयुक्त अजोय मेहता आज (सोमवारी) स्थायी समितीच्या विशेष बैठकीत अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे आगामी वर्षांचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

शहरातून वाहतुकीला गती देण्यासाठी उभारण्यात येत असलेला सागरी किनारा मार्ग, पश्चिम आणि पूर्व उपनगरे जोडण्यासाठी प्रस्तावित गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, पादचारी पूल-उड्डाणपूल-आकाशमार्गिकांची दुरुस्ती आदींसाठी अर्थसंकल्पामध्ये भरीव तरदूत करण्यात येणार आहे.

मात्र मोठे प्रकल्प आणि नागरी सुविधांसाठी निधीची कमतरता पडू नये यासाठी पालिकेकडून आकारण्यात येणाऱ्या विविध परवान्यांच्या शुल्कात वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे.

तर अर्थसंकल्पात कचऱ्यावरही कर आकारण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *