Jaimaharashtra news

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर खान आणि किरण रावने संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली. आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरित्या एक स्टेटमेंट जारी करत विभक्त झाल्याची घोषणा केली आहे.

‘आमच्या १५ वर्षांच्या संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत’, असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. दुष्काळग्रस्तांसाठी आमिर खान आणि किरण राव यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून मोठं काम केलं आहे.

आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. किरण राव या चित्रपटासाठी सहाय्य्क दिग्दर्शकाचं काम करत होती. आमिर आणि किरण २८ डिसेंबर २००५ रोजी विवाहबंधनात अडकले होते. किरण रावसोबत आमिर खानचं हे दुसरं लग्न होतं. या आधी २००२ सालामध्ये आमिर आणि अभिनेत्री रीना दत्त विवाहबंधनात अडकले होते. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला आयला आणि जुनैद ही दोन मुलं आहेत.

Exit mobile version