Jaimaharashtra news

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला कोरोनाची लागण

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनासुद्धा कोरोनाची लागण होत आहे. आता बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिलासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. कंगनाने तिच्या चाहत्यांना याबाबत स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे. शुक्रवारी कंगनाने कोरोनाची चाचणी केली होती.त्या चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे.

कंगनाला कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर तिने कोरोनाची चाचणी केली. अहवाल पॉजिटीव्ह आल्यानंतर ती गृहविलगीकरणात असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत असल्याचं तिने सांगितलं आहे.

‘गेल्या काही दिवसांपासून मला अशक्तपणा जाणवत होता. माझ्या डोळ्यांमध्ये जळजळ होत होती. मला हिमाचल येथे जाण्यापूर्वी कोरोना चाचणी करून घ्यायची होती. मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज मला कळाले. मी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे’, असं कंगनाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Exit mobile version