Wed. Oct 27th, 2021

अभिनेत्री मौनी रॉय लवकरच अडकणार लग्नाबंधनात…

कोरोना काळात अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्याचे लग्न झाले. आता अभिनेत्री मोनी रॉय ही सुद्धा लकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं समोर आलं आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री मोनी रॉयच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहे. मोनी लवकरचं तिच्या प्रियकरासोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, मौनी लवकरच दुबई स्थित एका बॅकरसोबत लग्न करणार आहे. सूरज नांबियार असं तिच्या प्रियकराचं नाव असून तो एक बॅकर आहे.

कोरोना काळात म्हणजेच लॉकडाउनच्या दिवसात मौनी तिच्या बहिणीच्या घरी दुबईमध्ये होती. त्याचवेळी तिची आणि सूरजची ओळख झाली. सध्या हे दोघ एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, मौनीने मध्यंतरी सूरजसोबत काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. शिवाय फोटो शेअर करत तिने सूरजसोबतचं नातं जाहीर केलं होतं. छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या मौनीने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून सध्या मौनी लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मोनीने तिच्या करियरची सुरूवात छोट्या पडद्यापासून केली होती. त्यानंतर तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवुडमध्ये नाव कमावले. आता मोनी लवकरच लग्नबंधानात अडकणार असल्यानं सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *