बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी साईबाबांच्या चरणी

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सहकुटुंब शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले आहेत. यावेळी शिल्पा शेट्टीसोबत तिची बहिण शमिता आणि आईही बरोबर होती.
मी साईबाबांचे धन्यवाद मानायला शिर्डीला आली असल्याचं शिल्पा शेट्टीने सांगितले.

यावेळेस साई समाधी मंदिरात जाऊन या सर्वांनी साईंची पाद्यपुजा केली. त्यानंतर साई संस्थानच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी सर्वांचे साई मूर्ती देऊन सत्कार केला.
काय म्हणाली शिल्पा ?
बारा वर्षानंतर निक्कम्मा आणि हंगामा या चित्रपटात काम करतेय. त्याच बरोबरीने सुपर डान्सर मध्येही जज्ज करतेय त्यामुळे मी बीझी आहे. मी साईबाबांचे धन्यवाद मानण्यासाठी साईकडे आले आहे.
तसेच प्रत्येक क्षणी साईबाबा माझ्यासोबत आहेत. आणि मी त्यांना विसरणार नाहीत, हे सांगायला मी येत असते, अशी प्रतिक्रिया शिल्पा शेट्टीने साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना दिली.
दरम्यान शिल्पा शेट्टीने नोव्हेंबर 2018 सालीही सहपरिवार साईबाबांचे दर्शन घेतले होते. त्यावेळेस शिल्पा शेट्टीने साईबाबांना 800 ग्रॅमचा सोन्याचा मुकूट अर्पण केला होता.