‘झुंड’ ट्रेलर : बच्चनचा आवाज, अजय-अतुलचा धमाका; ‘हा’ सीन नेमका कुठे शूट झालाय?

‘सैराट’च्या अफाट यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मंजुळेंच्या पहिल्याच बॉलिवूड सिनेमात थेट महानायक अमिताभ बच्चन काम करत आहेत. त्यामुळे या सिनेमाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. अखेर नागराज पोपटराव मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ सिनेमाच टिझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. 8 मे ला सिनेमाला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या सिनेमात ‘सैराट’ प्रमाणेच या सिनेमातही फिल्म, अभिनयाचं बॅकग्राऊंड नसलेल्या मुलांशी महानायक अमिताभ बच्चन यांची जुगलबंदी आहे.
विशेष म्हणजे टिजरमध्ये प्रेक्षकांना पहिला अनपेक्षित धक्का बसतो, कारण एकमेव आणि मोठं नाव असणारे अमिताभ बच्चन सबंध टिजरमध्ये दिसतच नाहीत.
‘झुंड नही हे ये इसे टिम कहो टिम’ हा Big B च्या आवाजातला दमदार डायलॉग Black स्क्रीनवर ऐकायला येतो.
त्यानंतर अजय-अतुल यांच्या धमाकेदार बॅकग्राऊंड म्युझिकच्या पार्श्वभूमीवर मुलांची टोळी चालत असताना दिसते.
यातील कोणत्याही मुलाचा चेहरा दिसत नाही. जाणवतो तो मुलांच्या टोळक्यातून भन्नाट पद्धतीने फिरणारा कॅमेरा.
मुलांच्या हातात साखळी, बॅट इत्यादी आयुधं आहेत, ज्यामुळे एखाद्या हाणामारीसाठी ही मुलं जात आहेत, असा भास होतो. हा सर्व सीन नागपूरच्या मार्केटमध्ये शूट केलेला आहे. झुंड सिनेमाचं शुटिंग नागपूरमध्येच करण्यात आलंय.
‘मी स्वतः या क्षणाची प्रचंड वाट पाहात होतो. अखेर तो क्षण आला.’असं कॅप्शन देत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या सोशल मीडियावरून सिनेमाच पोस्टर शेअर केलं होतं. तेव्हापासूनच टिजर कसं असेल, याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
स्लम सॉकर NGO चे विजय बारसे यांच्या जीवनावर सिनेमाचं कथानक आहे. विजय बारसे हे झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिब मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देतात. स्लम सॉकर या संस्थेमार्फत ते हे काम करत असतात. विजय बारसे यांच्या मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चन असणार आहेत.