आदित्य नारायण लवकरच अडकणार लग्नबेडीत
आदित्य नारायण गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी करणार लग्न…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण लवकरच अडकणार लग्नबेडीत काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालशी लग्न करत असल्याचा खुलासा आदित्यने केला. या संदर्भात त्याने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखत सांगितलं.
या मुलाखतीमध्ये त्याने त्यांच्या लग्नाबद्दल काही गोष्टी शेअर केल्या आहे. ‘मी १ डिसेंबरला लग्न करणार आहे. कोरोना व्हायरसमुळे माझा लग्नसोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंदिरात होणार आहे’ असं आदित्यने सांगितलं नंतर कदाचित मी मोठे रिसेप्शन आयोजित करू शकतो.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये लग्न बंधनात अडकणार असल्याचं आदित्य सांगितलं होतं. आदित्य आणि श्वेता ओळख ‘शापित या चित्रपटाच्या सेटवर झाली. सुरुवातीला त्याच्यात चांगली मैत्री जमली त्यानंतर त्यांना प्रेम झालं असं आदित्यनं यावेळी सांगितलं.