Sun. Jul 12th, 2020

सोशल मीडियावर व्हायरल झाला ‘राणू मंडल पार्ट २’

पुन्हा एकदा राणू चर्चेत…

रोजचं अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाचं एक व्हिडिओ काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ म्हणजे राणू मंडलचा रेल्वे स्थानकावर गाणं गाऊन पैसे मिळवून उदरनिर्वाह करणारी राणू ही रातोरात स्टार झाली. जसा हा व्हिडिओ व्हायरल झाला तसंच राणूच आयुष्यचं बदलून गेलं.

सध्या आणखी एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत राणू मंडल सारखा मिळता जुळता चेहरा असणारी एक महिला दिसत आहे. या व्हिडिओला आणखी एक राणू मंडल असं कॅप्शन दिले आहे. ही महिला गुवाहाटीमधली असून या व्हिडिओत ती महिला राणूचा नक्कल म्हणजेच ‘तेरी मेरी काहानी’ गातांना दिसत आहे.

राणू मंडल पार्ट २ अस एका इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका युजरनं हा व्हिडिओ शेअर केलाय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे राणू फार चर्चेत आली होती. प्रसिद्धी मिळाल्यामुळे आता राणूच्या लुकमध्ये फार बदल झाला तिच्या वागण्यातही बदल झाला. तिला यामुळेच अनेकांनी ट्रोल केलं होत.

एक चाहती दुकानात राणूला भेटली. या चाहतीला राणू बरोबर सेल्फी काढायचा होती. मात्र राणूचे लक्ष वेधण्यासाठी या महिलेनं राणूच्या खांद्यावर हात ठेवला. या चाहतीने राणूसोबत एक सेल्फी काढायची विनंती देखील केली. मात्र राणू तिच्या फॅनवर चिडली .’हे काय आहे? तू माझ्या अंगाला हात लावून कशी काय बोलवतेस मला?’ असा सवाल राणू तिच्या फॅनला विचारला. एका सेल्फीसाठी विनंती करणाऱ्या या फॅनसोबत राणू कशी वागली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *