Sat. Apr 17th, 2021

#HappyBirthdayVarunDhawan एक Assistant Director ते अभिनेता

Student Of The Year या चित्रपटातून झळकलेला अभिनेता म्हणजे वरुण धवन. वरुण धवनचा आज वाढदिवस असून वयाच्या 32व्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे. वरुण धवन हा प्रसिद्ध दिग्दर्शक डेविड धवन यांचा मुलगा आहे. अभिनेता बनण्यापूर्वी वरुणने प्रसिद्ध दिग्दर्शक Karan Johar  यांच्यासोबत Assistant Directorचे काम केले. त्यानंतर 2012 साली Karan Johar ने Student Of The Year या चित्रपटात रोहन नंदा या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्यानंतर वरुनने एकापेक्षा एक हिट चित्रपट केले.

Assistant Director ते Superstar ‘वरुण धवन’ चा प्रवास –

वरुन धवनने 2012 साली अभिनया क्षेत्रात प्रवेश केला.

Student Of The Year हा त्याचा पहिला चित्रपट असून प्रचंड गाजला.

अभिनया क्षेत्रात येण्यापूर्वी वरुन धवनने एच.आर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर इंग्लडच्या नोटिंगहम ट्रेंट या विद्यापीठातून शिक्षण घेतले.

प्रसिद्ध दिग्दर्शक करन जोहार यांच्या My Name Is Khan या चित्रपटासाठी वरुनने Assistant Director चे काम केले.

वरुनने आतापर्यंत 13 चित्रपटात काम केले आहे.

वडिलांच्या प्रसिद्धीवर अवलंबून न राहता बॉलिवूडमध्ये त्याने त्याचं एक विश्व निर्माण केलं आहे

सध्याच्या तरूणाईचा खास अशा या हिरोला Happy Birthday!.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *