माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या ‘झंझावात’ या पुस्तकाचं प्रकाशन

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या झंझावात या पुस्तकाच प्रकाशन सोहळा संपन्न मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यास शरद पवार, नितीन गडकरी, विनोद तावडे हे मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी राणेंच्या झंझावती प्रवासाबद्दल भाष्य केले आहे.
काय म्हणाले राणे?
शिवसेना राज्यात फोफावली आणि शिवसेनेने प्रचारासाठी एक तालुका सोडला नाही. त्यामुळे मला गड़चिरोलीचा संपर्कप्रमुख केलं. मला जम्मू-काश्मीरची जबाबदारी दिली. बाळासाहेबांना म्हटलं साहेब तिथे गोळ्या खाव्या लागतील. मी नाही गेलो. मला बाळासाहेबांच अपार प्रेम लाभलं. बाळासाहेबांनी माझ्यावर खूप प्रेम केलं आणि बाळासाहेबांनी माझी खूप काळजी घेतली.
मला बाळासाहेबांनी कॅबीनेट मंत्रीपद दिलं महसूल मंत्री असतांना पत्रकारांनी जोशी जाणार राणे येणार या बातमीवर प्रतिक्रीया विचारली. मला मुख्यमंत्रीपद दिलं तर आवडेल अशी प्रतिक्रीया दिल्यानंतर मला मातोश्रीवरुन बाळासाहेबांचा फोन आला. मी म्हटल साहेब, मी कुणाला काढून मला बनवायला सांगीतल नाही. मुख्यमंत्री बनायला गॉडफादर असायची गरज नाही चिकाटी, मेहनत लागते मी कधी पद मागितली नाही.
राणे पक्षात राहील तर मी मातोश्रीतून निघून जाईल. अशी धमकी उध्दव ठाकरेंनी दिली. शिवसेनेसाठी अनेकांनी त्याग केला. पुस्तकातला मजकूरापेक्षा पवारांचा प्रस्तावना सर्वात महत्वाचा केलेल्या कामांची प्रेरणा मला मिळाली.