Thu. Oct 22nd, 2020

‘रेनॉल्ट’ची 7 सीटर ‘ट्रायबर’ कारसाठी बुकिंग सुरू

‘रेनॉल्ट’ कंपनीची नवी ट्रायबर ही कार लॉन्च होणार आहे. सध्या 7 सीटर गाड्यांची मागणी वाढतेय. Renault Triber ही देखील 7 सीटर कार आहे. सध्याच्या इतर 7 सीटर कार्सपेक्षा ‘ट्रायबर’ कारची किंमत कमी असल्याचं सांगण्यात येतंय.

ट्रायबर कारचं लॉन्चिंग 28 ऑगस्टला होणार आहे.

17 ऑगस्टपासून या कारचं बुकिंग करता येणार आहे.

कंपनीच्या वेबसाईटवरुन हे बुकिंग करता येऊ शकतं.

त्यासाठी 11 हजार रुपये टोकन द्यावं लागणार आहे.

Renault Triber ची किंमत 5.5 ते 7.5 लाख रुपये असेल, असं सांगण्यात येतंय.

काय आहे या कारची वैशिष्ट्यं?

Renault Triber च्या सीट्स 100 पेक्षा जास्त प्रकारे अडजस्ट करता येऊ शकतात.

या कारमध्ये ड्युएल-टोन कलर स्किम आहे.

इंस्ट्रूमेंट क्लस्टरमध्ये 3.5 इंच LED स्क्रीन तशीच 7.9 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट स्टिस्टम आहे.

इंफोटेनमेंट स्टिस्टममध्ये Apple Car Play आणि Android Auto App चा सपोर्ट आहे.

तसंच, रेनॉल्ट ट्रायबरमध्ये ड्युएल फ्रंट एयरबॅग, रियर पार्किंग सेंसर, स्पीड वॉर्निंग सिस्टम तसंच एबीएस आहे. रिवर्स पार्किंग कॅमेरा आणि एयरबॅगही यात मिळू शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *