बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रमुख पाहुण्यांचा दौरा हा रद्द

दरवर्षी भारतात प्रजासत्ताक दिनाला विविध देशाचे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात. मात्र ह्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रमुख पाहुण्यांचा दौरा हा रद्द झाला आहे. २०२१ च्या प्रजासत्ताक दिना निमित्ताने ह्या सोहळ्याला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन उपस्थित राहणार होते. परंतु संपूर्ण कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता. त्यांनी आपला भारत दौरा हा रद्द केला आहे. बोरिस जॉन्सन यांनी भारताचे निमंत्रण स्वीकारलं होत अशी माहिती भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी यासंबंधी माहिती दिली होती. परंतु त्यांचा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.