लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला…

अभिनेता अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात देवी लक्ष्मीच्या नावाचा वापर करुन हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहे तसेच हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ताच्या मते या चित्रपटातून लव्ह जिहादला उत्तेजन दिलं जातं आहे.
चित्रपटात बदल न केल्यास हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही असं हिंदू सेनेने म्हटलं आहे. हिंदू सेनेने लक्ष्मी बॉम्ब सिनेमातील कलाकार, दिग्दर्शक यांच्याविरोधात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना एक पत्र लिहलं आहे आणि या सिनेमाला विरोध दर्शवला आहे. या चित्रपटाद्वारे देवीचा अपमान केला जातं आहे असं हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी म्हटलं आहे.
या चित्रपटात अक्षय कुमारने आसिफ नावाची भूमिकेत आहे तर कियारा अडवाणी या अभिनेत्रीने पूजा हे पात्र साकारतं आहे. या चित्रपटात आसिफचं पूजावर प्रेम असतं असं दाखविलं आहे. त्यामुळे या सिनेमातून लव्ह जिहादला प्रोत्साहन आहे असा नेटकऱ्यांचा समज झाला आहे. त्यामु़ळे अक्षय कुमारला नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे