ब्राझील सरकारने भारत बायोटेक या कोव्हॅक्सिन उत्पादक कंपनीशी केलेला लस खरेदीचा करार वादात सापडला आहे. ब्राझीलमधील व्हिसलब्लोअरनी या कराराबद्दल आरोग्य मंत्रालयातील अधिकारी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेइर बोल्सोनारो यांच्यावर गंभीर आरोप केले. हा मुद्दा ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर सरकारने लस खरेदी करार स्थगित केला. या वृत्तानंतर भारत बायोटेकने करार आणि लसीच्या किंमतीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ब्राझील सरकारने कराराला स्थगिती दिल्यानंतर भारत बायोटेकने होत असलेल्या आरोपांबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत बायोटेकने निवेदन प्रसिद्ध केलं असून, त्यात कराराची प्रक्रिया आणि लसीच्या किंमतीबद्दलही खुलासा करण्यात आला आहे. “ब्राझीलकडून खरेदी करण्यात येणारा कोव्हॅक्सिन लस करार टप्प्याटप्याने करण्यात आला. कराराची ही प्रक्रिया आठ महिने चालली. कोव्हॅक्सिनला ४ जून २०२१ रोजी आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळाली. त्यानंतर २९ जूनपर्यंत ब्राझीलला लसींचा पुरवठा करण्यात आलेला नाही, त्याचबरोबर ब्राझीलकडूनही रक्कम मिळालेली नाही,” असं भारत बायोटेकने म्हटलं आहे.
ब्राझील सरकारने भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकलेला कोवॅक्सिन लस खरेदी करार रद्द केला आहे. ब्राझीलमध्ये या करारावरून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यानंतर सरकारने ३२ कोटी डॉलरचा करार रद्द केला आहे. ब्राझीलमध्ये भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीच्या करारावरून मोठा गदारोळ सुरू होता. त्यानंतर ब्राझीलने भारत बायोटेक कंपनीसोबत केलेला कोरोना लशीचा करार रद्द केल्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी देशाच्या आशा-आकांक्षा…
मी उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार नाही, अडीच वर्षांचा फॉर्म्युला भाजपने कधीच सांगितला नव्हता, असं वक्तव्य…
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटप या दोन गोष्टींवरून जोरदार राजकीय चर्चा…
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून विश्रांती घेतल्याने पंचगंगेची नदी झपाट्याने उतरु लागली आहे. राधानगरी…
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन झालं आहे. मुंबई-पुणे…
मुंबई शेअर बाजारातील 'बिग बुल' अशी ओळख असलेले राकेश झुनझुनवाला यांचे आज सकाळी निधन झाले…