Sun. Oct 17th, 2021

बैलाचा दशक्रियाविधी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

आजवर देशात प्राण्यांची कत्तल होत असल्याच्या घटना नेहमीच पाहायला मिळल्यात. नाशिकच्या बनसोडे कुटुंबानं आपल्या पाळीव बैलाच्या मृत्यूनंतर घरचा सदस्य

गमावल्याप्रमाणे त्याचा अंत्यविधी केला.

 

सहा वर्षांचा बैल ‘बंड्या’ अनेक मोठमोठ्या शर्यती जिंकून गावाचं नाव महाराष्ट्रभर गाजवत होता.

 

परंतू 30 जूनला त्याच्या अचानक जाण्यानं कुटुंबावर शोककळा पसरली. तर, कुटुंबियांनी दहा दिवस सुतक पाळून आज त्याचा दशक्रिया विधीही केला.

 

या घटनेनंतर बनसोडे कुटुंबाच्या माणुसकीचं समाजाला दर्शन घडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *