Wed. Oct 21st, 2020

बारामतीचे बिल्डर दादा साळुंखे यांच्या हत्येचं गूढ!

उजनी धरणा खालील बाजूस सोलापूर – पुणे हायवे ब्रिजखाली बारामतीचे बिल्डर व्यावसायिक दादा साळुंखे यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा मृतदेह आढळला असूनत्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आला असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहेत.

मृतदेहाच्या अंगावर पांढरा शर्ट आणि निळी जीन्स पॅन्ट होते. मृतदेहाच्या शर्टवर ‘सिक्वेरा टेलर्स बारामती’ असा टेलर मार्क होता. यावरून हा मृतदेह बारामती किंवा परिसरातील असण्याची दाट शक्यता टेंभुर्णी पोलिसांना आली. त्या दृष्टीने त्यांनी तपास सुरू केल्यावर बारामतीचे प्रसिद्ध बिल्डर दादा साळुंखे यांचा हा मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं आहे.  वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे.

घटनास्थळावर वाहनाचे टायर मार्क दिसून येत असल्याने साळुंखे यांचा इतरत्र कोठे तरी खून करून त्याचे प्रेत पुलाखाली आणून टाकले असावे असा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत. टेम्भुर्णी पोलिस ठाण्यात या संदर्भात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळुंखे यांच्या हत्येचं गूढ उकलण्याचा पोलीस आता प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *