Thu. Jul 16th, 2020

पीक कर्जासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्याला अखेर अटक…

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

पीककर्जासाठी बँक मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाणामध्ये घडला. महिलेच्या तक्रारीवरुन आधिकाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा अधिकारी राजेश हिवसेला बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांनी अटक केली आहे. दाताळा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा अधिकारी राजेश हिवसे हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता, त्याच्या शोधासाठी पोलिस पथकं रवाना करण्यात आली होती. अखेर मलकापूर पोलिसांनी त्याला नागपुरातून अटक केली.

नेमकं प्रकरण काय आहे ?

  • शेतकरी आणि त्याची पत्नी पीककर्जासाठी दाताळातल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेले होते.
  • तिथे बँक मॅनेजरने कागदपत्रांची तपासणी करुन तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना केली.
  • संबंधित शेतकऱ्यानं त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला.
  • त्यानंतर मॅनेजरनं शेतकऱ्याच्या पत्नीसोबत अश्लील संभाषण करत त्यांना शरीरसुखाची मागणी केली.
  • मोबदल्यात पीककर्जासह वेगळं पॅकेजही दिलं जाईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठवला.
  • याप्रकरणी मॅनेजर आणि शिपाई या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
  • शिपायाला अगोदरच अटक करण्यात आली होती, तर बँक मॅनेजरला आज अटक करण्यात आली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *